MHT-CET – 2019 परीक्षेचे ऑनलाइन फॉर्म भरण्यास 1 जानेवारी पासून सुरवात झाली असून आपले सरकार सेवा केंद्र केकरजवळा हे CET चे फॉर्म भरण्याचे अधिकृत Facilitation Center आहे.
CET ची परीक्षा ही इंजिनीरिंग, बी फॉर्मसी, डी फार्मसी, ऍग्री इत्यादी कोर्सच्या ऍडमिशन साठी घेण्यात येते. यावर्षी पहिल्यांदाच ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांना त्याची प्रॅक्टिस असणे खूप गरजेचे आहे, ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर प्रॅक्टिस टेस्ट देण्याची सुविधाही आमच्या केंद्रावर अधिकृतरीत्या उपलब्ध करून देण्यात आली आहे.
MHT-CET साठी महत्वाच्या तारखा –
1) अर्ज करण्याची मुदत : 1 जानेवारी ते 23 मार्च
2) विलंब शुल्कासह अर्जाची मुदत – 24 मार्च ते 31 मार्च
3) शुल्क भरण्याची मुदत : 3 एप्रिल
4) हॉल तिकीट उपलब्ध : 25 एप्रिल ते 2 मे
5) CET परीक्षा – 2 मे ते 13 मे
(वरील सर्व तारखा संभाव्य असून https://mhtcet2019.mahaonline.gov.in या लिंक वर अपडेटेड तारखा चेक कराव्यात)