असंघटीत कामगारांसाठी पेंशन योजना, आयुष्यभर मेहनत करणाऱ्या कामगारांसाठी सरकारची नवी पेंशन योजना, या योजनेअंतर्गत मिळवू शकता महिना कमीत कमी ३००० एवढी पेंशन वयाच्या ६० वर्षानंतर.
वयोगट
१८ - ४०
मासिक उत्पन्न
१५,००० किंवा कमी
ह्या योजने साठी १८ ते ४० वर्ष वयोगटातील लाभार्थी अर्ज करू शकतात. ह्या योजनेमध्ये वयोमानानुसार हप्ता राहील ज्याच्या वय कमी त्याला कमी हप्ता असेल. जेवढा लाभार्थ्यांचा हिस्सा असेल तेवढ्या हिस्स्याच्या सरकारचे योगदान असेल.
पहिला हप्ता हा नगद स्वरूपात भरावा लागेल, मग समोरील हप्ते आपोआप बँक खात्यातून वजा केले जातील. जर बँक खात्यामध्ये पैसे नसतील तर योजना बंद होणार नाही, ज्यावेळी खात्यात पैसे येतील त्यावेळी ते वजा केले जातील.
जर काही करणास्थव पैसे काढण्याची गरज भासली तर लाभार्थ्याचा हिस्सा बँक व्याजासह परत मिळेल, जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर ह्या योजनेचा लाभ त्याच्या पत्नीस घेता येईल.
योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी फक्त आधार कार्ड व बचत खात्याच्या बँक पासबुक ची प्रत घेऊन केकरजवळेकर मल्टिसर्विसेस, बस स्टॅन्ड जवळ, केकरजवळा येथे आजच भेट द्या.
वयानुसार भरायची रक्कम खालील प्रमाणे आहे –
तरुणपणात कराल थोडं शहाणपण तर, आनंदात जाईल म्हातारपण...
योजनेच्या अधिक माहिती साठी किंवा योजनेत सहभागी होण्यासाठी केकरजवळेकर मल्टिसर्विसेस वर आजच भेट द्या.