केकरजवळेकर मल्टिसर्विसेस, कॉमन सर्विस सेंटर केकरजवळा मार्फत संत तुकाराम विद्यालय, केकरजवळा येथील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या PMG DISHA योजने अंतर्गत मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येत आहे.
ह्या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र शासनाने संगणक साक्षर करण्याचे ठरवले आहे. योजनेअंतर्गत लाभार्त्यांना मोफत सात दिवसाचे संगणक प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणामध्ये लाभार्त्यांना संगणकाविषयी मूलभूत माहिती व्हिडिओ तसेच प्रात्येक्षित स्वरूपात देण्यात येते. तसेच डिजिटल ट्रान्सेक्षन, इमेल, स्मार्टफोन, संगणक, इंटरनेट चा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. जेणे करून या डिजिटल जगात वावरताना कुठल्याही अडचणींचा सामना करण्यास अडचण येणार नाही.
लाभार्त्याने प्रशिक्षन पूर्ण केल्या नंतर संगणकावरच परीक्षा घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर लाभार्त्यांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र देण्यात येते.
जर आपणही मोफत संगणक प्रशिक्षण घेण्यास उत्सुक असाल तर आजच संपर्क करा – ९८२२८१०२२७. तसेच अधिक जाणून घेण्यासाठी https://www.pmgdisha.in ह्या वेबसाईट वर भेट द्या.