कोणासाठी आहे EWS 10% आरक्षण ?
केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या सवर्ण लाभार्थ्यांसाठी (EWS – Economically Weaker Section) 10% आरक्षण घोषित केले आहे. ह्या निर्णयानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना सरकारी नौकरी तसेच शिक्षण क्षेत्रात 10% आरक्षण मिळणार आहे. तसेच ह्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना वय, परीक्षा फी, व इतर सवलतीचा लाभ मिळेल.
काय आहेत EWS 10% आरक्षणासाठी पात्रता निकष (राज्य सरकार) ?
- अर्जदाराच्या कुटुंबाचे (वडील, आई व 18 वर्षाखालील मुले) यांचे सर्व स्रोतांपासून चे एकत्रित उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे.
- आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- इतर कुठल्याही प्रवर्गाअंतर्गत ( जसे की SC, ST, OBC ) अंतगर्त येणारे लाबार्थी EWS आरक्षणास पात्र नाहीत
EWS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र.
- लाभार्थी व त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड.
- लाभार्थी व त्यांच्या वडिलांची TC / निर्गम उतारा.
- राशन कार्ड.
- रहिवाशी प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचा पुरावा (सातबारा, 8 अ / फॉर्म 16 / आयकर भरल्याचा पुरावा).
- अर्जदार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्या बाबतचा पुरावा.
- स्वघोषणा पत्र.
- विहित नमुन्यातील अर्ज.
- 3 पासपोर्ट फोटो.
कसे मिळवावे EWS चे प्रमाणपत्र ?
EWS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसहित आपले सरकार सेवा केंद्र, केकरजवळेकर मल्टिसर्विसेस, बस स्टॅन्ड जवळ, केकरजवळा येथे भेट द्या.
अधिक माहितीसाठी संपर्क करा :
केकरजवळेकर मल्टिसर्विसेस,
बस स्टॅन्ड जवळ,
केकरजवळा.
ता. मानवत, जिल्हा परभणी, महाराष्ट्र, 43154